Top News देश

कोरोनाच्या भीषण संकटात सानिया मिर्झा गरिबांना करणार मदत

Loading...

मुंबई |  कोरोनाचं भीषण संकट सध्या देशासह महाराष्ट्रावर आलेलं आहे. कोरोना व्हारसचा फटका करोडो लोकांना बसला आहे. यामध्ये बड्या सेलिब्रेटींपासून ते हातावर पोट असलेल्या गरीबांना समावेश आहे. अगदी सगळ्यांनाच घरात बसणं कर्मप्राप्त झालं आहे. अशात देशात 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला आहे. त्यामुळे गरिबांच्या पोटापाण्याचं काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर टेनिसस्टार सानिया मिर्झा गरिबांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

कोरोना व्हायरसमुळे गरिबांमुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेऊन भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने रोजंदारीवर काम करणाऱ्यांना जेवण आणि मुलभूत गरजेच्या वस्तू पुरवण्याचा मानस आखला आहे. त्यासाठी तिने एक चळवळ उभी केली आहे.

Loading...

कोरोनामुळे अनेकांचे नुकसान होतंय. सध्याच्या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांना अतिशय कठीण दिवस आहेत. त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपापल्या परीनं त्यांना मदत करण्याची हीच वेळ आहे, असं तिने म्हटलं आहे.

दरम्यान, संपूर्ण जग सध्या आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. आपण घरी सुरक्षित आहोत हे आपलं नशीब आहे, असं तिने म्हटलं आहे. तसंच सध्या घरी रहा काळजी घ्या अन् तंदुरूस्त रहा, असा सल्ला तिने दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

महत्वाच्या बातम्या-

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु- उद्धव ठाकरे

लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या