मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी 27 जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. तर मंगळवारी पोलिसांनी संजना सांघी हीचीही जबाब घेतला. यावेळी संजनाने सुशांतवर कधीही गैरवर्तनाचे आरोप केले नसल्याचं सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतवर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर त्याला डिप्रेशनच्या समस्येला सामोरं जावं लागतं होतं. आपली प्रतिमा खराब करण्यासाठी कोण तरी प्रयत्न करतंय अशी सतत भीती असायची. या अनुषंगाने संजनाची चौकशी करण्यात आली.
‘मी सुशांतवर #MeToo अंतर्गत कोणतेही आरोप केले नव्हते. सुशांतवर हे आरोप केले त्यावेळी मी अमेरिकेत होती. माझ्या नावाने फेक अकाउंट बनवत मी सुशांतवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप व्हायरल करण्यात आले होते. जेव्हा याबद्दल मला समजलं तेव्हा मी आमच्या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअरही केले होते. सुशांत माझ्याशी कधीही चुकीचं वागला नव्हता’, असं संजनाने पोलिसांसमोर स्पष्ट केलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत. याशिवाय विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करण्यात येतोय.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना
‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद
महत्वाच्या बातम्या-
“पांडुरंग सोबतच आहे परंतू आरक्षणाचं काही बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील”
Doctor’s day- कोरोनाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टर योद्ध्यांना विराट-रोहितचा सलाम
“आपण कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवित आहोत, सुजलाम-सुफलाम महाराष्ट्र घडवू या”