Top News महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांनी हरामखोर शब्दाचा अर्थ त्यांच्या शब्दात सांगितला; म्हणाले…

मुंबई | अभिनेत्रा कंगणा राणावतने मुंबई आणि मुंबई पालिसांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने कंगणावर सर्वांनी जोरदार  टीका केली. कंगणावर टीका करताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कंगणाला हरामखोर असं म्हटलं होतं. त्यामुळे राऊतांवर चौफेर टीका झाली. मात्र राऊतांनी त्यांच्या शब्दात हरामखोर शब्दाचा अर्थ सांगितला आहे.

महाराष्ट्रात हरामखोरचा अर्थ नॉटी असा होतो. बेईमान असा होतो. आमच्या मते कंगणा दोन्ही आहे. माझ्या मते ती नॉटी गर्ल आहे. ती नेहमीच मजाक मस्करी करत असते हे मी पाहिलं आहे. मुंबईत राहणारी कोणतीही मुलगी देश, महाराष्ट्र आणि मुंबईबाबत काहीही बरळत असेल तर माझ्या मते ती बेईमानच आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांमुळे सर्वजण सुरक्षित आहेत. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा धोका होता. अंडरवर्ल्डकडून धमक्या दिल्या जात होत्या. मुंबई पोलिसांनी सर्वांची पाळेमुळं खणून काढली. केवळ एखादी पुरुष किंवा स्त्री म्हणजे संपूर्ण इंडस्ट्री नाही, असं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, तुम्हाला ड्रगबाबत माहिती असेल तर तुम्ही पोलिसात जा त्यांना माहिती द्या. जर तुमचे भाजपसोबत संबंध चांगले असतील तर दिल्लीत जाऊन तक्रार करा, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

करणी सेनेचा कंगणा राणावतला पाठिंबा; कंगणाच्या सुरक्षेसाठी सदस्य विमानतळावर उपस्थित राहणार

‘…तर एकाही अधिकाऱ्याला गाडीत फिरून देणार नाही’; रूपाली पाटलांचा इशारा

“कंगणासारखे उपरे आणि जॅकलीन फर्नांडीस, दिशा पटानी अस्सल मराठी, बरोबर ना?”

कंगणा राणावतला होम क्वारंटाईन करणार- किशोरी पेडणेकर

…अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही- अबू आझमी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या