Top News मुंबई

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच- संजय राऊत

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांत सिंग राजपूतवर भाष्य केलं आहे. सुशांत सिंग राजपूत मुंबईचाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात बोलत असताना संजय राऊत म्हणाले, “सुशांत सिंग राजपूतला मी बिहारचा मानत नाही. तो मुंबईचाच होता. बिहारमध्ये असताना त्याला कोण ओळखत होतं? तो मुंबईत आला आणि त्याच्या कामाने त्याला ओळख मिळालीये. मुंबई ही त्याची कर्मभूमी होती”

राऊत पुढे म्हणाले, “सुशांतला न्याय मिळाला हवा, हे ओरडणाऱ्यांपेक्षा आम्हाला जास्त वाटतंय. ओरडून खोट्याचं खरं करता येत नाही. जर सुशांतसोबत काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ.”

सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो तपास खरा आहे. शिवाय यावर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे, असंही राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

जुनी थडगी उकरली तर तुमच्याच पापाचे सांगाडे दिसतील- संजय राऊत

दिवाळीला ‘सॅल्यूट टू सोल्जर’ म्हणून एक दिवा लावूया; पंतप्रधान मोदींचं आवाहन

संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप

‘मलाही मुलगी आहे, मी नेहमीच स्र्त्रीयांचा सन्मान केला’; छेडछाडीच्या आरोपांवर विजय राज यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा जैसलमेर सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या