मुंबई | मोदींनी शिवसेनेला दिलेल्या अवजड उद्योग मंत्रीपदाबाबत आम्ही नाराज नाही, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मोदी सरकारमधील नव्या खातेवाटपात शिवसेनेला कोणतीही दुय्यम वागणूक मिळाली नाही. आम्ही पूर्ण समाधानी आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींच्या सरकारमधील नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला एकमेव मंत्रीपद म्हणजे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
शिवसेनेला रेल्वे, उर्जा आणि नागरी उड्डाण या खात्यांची अपेक्षा होती. यापैकी एकही खातं न मिळाल्याने शिवसेना नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र संजय राऊत यांनी या चर्चांना पुर्ण विराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
-सुषमा स्वराज मंत्रीमंडळात नाहीत; लोक म्हणतायेत आम्हाला तुमची खूप आठवण येईल…
-वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मोदींच्या मंत्रीमंडळातून ‘या’ मंत्र्याला वगळलं
-राज ठाकरेंची भूमिका काय? स्वबळ की आघाडी; उलटसुलट चर्चा झाल्या सुरु
-महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे सोपावण्यात आली ‘या’ खात्यांची जबाबदारी
-अमित शहा गृहमंत्री होतील… ‘या’ नेत्याचं भाकित खरं ठरलं!
Comments are closed.