Top News आरोग्य मनोरंजन

संजू बाबाची अखेर कॅन्सरवर मात, भावनिक पोस्ट लिहीत चाहत्यांचे मानले आभार

मुंबई | बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने फुफ्फुसांच्या कॅन्सरवर अखेर मात केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित संजय दत्तने सगळ्यांना ही आनंदाची बातमी देत आभार मानलेत.

संजय दत्त लिहितो, ‘गेले काही आठवडे माझ्यासाठी तसंच माझ्या कुटुंबासाठी फार कठीण काळ होता. मात्र देव सगळ्यांना मजबूत करण्यासाठी अशा काहीशा खडतर प्रसंगांचा सामना करायला लावतो. आज माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जाहीर करतोय की, मी या आजारावर संपूर्णपणे मात केलीये.

ही माझ्या कुटुंबासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तुमच्या सगळ्यांचे आशिर्वाद आणि प्रार्थनांशिवाय हे शक्य झालं नसतं. या कठीण काळात मला साथ देणारं माझं कुटुंब आणि सगळ्या चाहत्यांचे मी आभार मानतो, असंही संजय म्हणालाय.

संजय पुढे म्हणतो, “डॉ. शेवंती आणि त्यांच्या टीमचे देखील विशेष आभार मानेन. कोकिलाबेन रुग्णालयातील सगळे डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी अतिशय काळजी घेतली. सगळ्यांचे मनापासून आभार.”

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, म्हणाले…

‘मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही’; खडसेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ भाजप नेत्याचा निर्धार

“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं”

कोण आहे ‘तो’ भाजपचा नेता, फक्त त्यानंच एकनाथ खडसेंना फोन केला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या