बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण…’; गडकरी म्हणतात…

नागपूर | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून नागपूर येथे सुरु करण्यात आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं शुक्रवारी उद्घाटन करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Bollywood Actor Sanjay Dutt) याच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांनी संजय दत्त सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

नितीन गडकरी यांनी यावेळी संजय दत्तबद्दल बोलताना, संजय दत्त यांनी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला, पण माणूसकी सोडली नाही, असं म्हटलं. शिवाय गडकरींना यावेळी संजय दत्त याचे वडील सुनिल दत्त यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचेही यावेळी वर्णन केलं.

संजय दत्त याने यावेळी उपस्थित प्रेक्षकांशी सवांद साधला, तो यावेळी म्हणाला, देशासाठी, लोकांसाठी काम करणारे माझे वडील सुनिल दत्त यांच्यानंतरचे नितीन गडकरी दुसरे नेते आहेत. नितीनजी माझे मोठे भाऊ आहेत, असं सांगून संजय दत्तने सिनेस्टाईलमध्ये त्यांच्यासाठी माझी जानही हाजिर आहे, असं म्हटलं आहे.

दरम्यान, खासदार महोत्सवाचे काल संजय दत्त याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. नागपूर येथे या महोत्सवाचे आयोजन केले जात असून महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. यावेळी बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग हे देखील उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या – 

‘त्रास देणाऱ्या सरकारला चांगलाच धडा शिकवा’ म्हणत एसटी कर्मचाऱ्यानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

महागाईचा भडका: सीएनजी पीएनजी दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या नवे दर

‘लोकशाहीवर भाजपने धडे देण्याची गरज नाही’; अजित पवार कडाडले

धक्कादायक! स्वप्नील लोणकर पाठोपाठ आणखी एका MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मोठी बातमी! काल रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांची विधानभवनाला भेट, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बाहेर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More