चाहतीचं प्रेम, सगळी संपत्ती केली संजय दत्तच्या नावावर

मुंबई | संजय दत्तच्या एका 62 वर्षांच्या चाहतीनं निधनापूर्वी आपली सर्व संपत्ती त्याच्या नावावर केली. निशी त्रिपाठी असं त्या चाहतीचं नाव होतं.

चाहत्यांच एवढं प्रेम पाहुन संजय दत्तला धक्काच बसला. निशी त्रिपाठी या मलबार हिल इथे राहत होत्या. त्याचं निधन 15 जानेवारी 2018ला झालं होतं.

29 जानेवारीला निशी यांच्या बॅंकेकडून संजय दत्तला याबद्दस समजलं. त्याने ती संपत्ती नाकारून निशी त्रिपाठी यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करावी, अशी विनंती बॅंकेकडे केली.