“ठाकरे ब्रँड नाहीच; बाळासाहेब होते तरीही…”, संजय गायकवाड यांची थेट टीका

Sanjay Gaikwad

Sanjay Gaikwad | मुंबईतील एनएससीआय डोममध्ये ठाकरे बंधूंचा ‘विजयी मेळावा’ पार पडला. त्यावर संजय गायकवाड यांनी रोखठोक भाष्य करत, दोघांच्या एकत्र येण्याने काहीच फरक पडणार नाही, असा दावा केला आहे.

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले, “महाराष्ट्रात कोणताही ब्रँड चालत नाही, इथे केवळ ‘विकास’ हाच खरा ब्रँड आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावणारा, तरुणांना रोजगार देणारा नेता हाच जनतेचा निवडणुकीतील ब्रँड ठरतो. ठाकरे बंधू एकत्र आल्याचे आम्हाला समाधान आहे, त्यांना शुभेच्छा देखील आहेत. पण काळ फार पुढे गेला आहे.”

मराठीचा अपमान सहन करणार नाही – संजय गायकवाड यांचा इशारा :

मराठी भाषेच्या मुद्द्यावरही संजय गायकवाड आक्रमक दिसले. “ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलायला लाज वाटते, त्यांच्या थोबाडावर मारलं पाहिजे. मराठीचा अपमान सहन करणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, “आज जगात टिकून राहायचं असेल तर सर्व भाषा शिकाव्या लागतात. पाकिस्तानचा दहशतवाद समजून घ्यायचा असेल, तर उर्दू भाषा अवगत असली पाहिजे.”

यासोबतच, त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न – ‘तुम्ही परराज्यात गेल्यावर मराठीत बोलणार का?’ – हा भाषिक अस्मितेवरुन सुरू असलेल्या वादात नव्याने पेट घालणारा आहे.

Sanjay Gaikwad | भोजपुरी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान, वातावरण तापले :

दरम्यान, भोजपुरी अभिनेते निरहुआ यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. त्यांनी थेट ठाकरे बंधूंना उद्देशून म्हटलं की, “तुमची हिंमत असेल तर आम्हाला महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा.” मराठी विरोध करत नाही, तर हिंदीवर आक्रमण करणारेच फुटीरतेचे राजकारण करत आहेत, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी हिंदी-भाषिक मतदारांमध्ये काय संदेश जातो आणि मनसे-शिवसेना यांची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News Title: Sanjay Gaikwad Attacks Thackeray Brand: Balasaheb Couldn’t Win Beyond 74 Seats

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

 

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .