बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तो दारु पिऊन दिवसभर वावरात पडलेला असतो’; भाजपच्या ‘या’ आमदारावर गायकवाडांची टीका

बुलडाणा | संजय कुटेसारखा तीनपाट आमदार जो दिवसभर दारु पिऊन वावरात पडलेला असतो, अशी बोचरी टीका शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार संजय कुटे यांच्यावर केली आहे. ते बुलडाण्यात माध्यमांशी बोलत होते.

अरे हरामखोर पुतळे काय जाळतो, जर हिंमत असेल तर माझ्या जवळ येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, असं खुलं आवाहनही संजय गायकवाड यांनी भाजप आमदार संजय कुटेेंना दिलं आहे.

पुतळे जाळले म्हणजे काय मोठं केलं का, मी जी भावना मांडली ती सर्व जनतेची आहे. हा महाराष्ट्र जिजाऊ-शिवरायांचा आहे. ज्या महाराष्ट्रातील शिवरायांचे वंशज जर तुम्ही मारत असाल, तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तुम्ही माझी काय तक्रार करता, मीच भाजपच्या सर्व लोकांविरुद्ध तक्रार करतो. या भाजपमुळे राज्यातील लोक मरु लागले आहेत तुम्ही काय आंदोलन करता?, असं संजय गायकवाड म्हणाले.

वाढता कोरोना, केंद्र सरकारने न केलेली मदत, ऑक्सिजनचा तुटवडा यावर मी एक व्हिडीओ बनवला होता. त्यावर भाजपकडून माझा पुतळ्याची जाळपोळ करण्यात आली. पण माझा यात काय दोष आहे? मी फक्त यावरची वस्तूस्थिती मांडली. केंद्राने मदत करायला हवी, ऑक्सिजन द्यायला हवा, रेमडेसिव्हीर दिलं पाहिजे. मात्र राज्यात आज फक्त शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. म्हणून केंद्र हे पुरवत नाही, असं संजय गायकवाड म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी खाल्याने होणार नाही साईड इफेक्ट

‘देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती’; संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध होईल- धनंजय मुंडे

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

होम क्वॉरंटाईन होऊन घरून उपचार घेत असाल तर सावधान;’या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं धोकादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More