बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?”

बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी अंडे, मटन खाण्याचा सल्ला दिला. यानंतर काही वारकऱ्यांनी यावर आक्षेप घेतलाय. यानंतरही संजय गायकवाड त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसतंय. मांसाहाराच्या वादावरून संजय गायकवाड यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?, असा सवाल संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांना केला आहे. तसेच जीव वाचवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता प्रोटीन मिळेल असं मी म्हणालो. मात्र काही लोकांनी ते आवाहन स्वतःच्या अंगावर घेऊन माझ्यावर टीका टिप्पणी सुरू केली, असं संजय गायकवाड म्हणाले.

मुस्लीम समाजामध्ये सुद्धा कोरोनानं मृत्यूचं प्रमाण नसल्यासारखा आहे. कारण त्यांचा जेवण प्रोटीनयुक्त आहे. म्हणून आपल्या लोकांनी तसं जेवण केलं तर कदाचित त्यांच्यातही प्रमाण कमी होईल. याच्यामध्ये माझं चुकलं कुठं? असं बोलल्यामुळे हिंदू समाजाची भावना दुखावली गेलीय तर आज जे 70-80 टक्के रुटिंगमध्ये नॉनव्हेज खातात त्यांचा कुठला धर्म भ्रष्ट झालाय?, असा सवाल संजय गायकवाड यांनी केलाय.

दरम्यान, कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज 4 अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा, असा सल्ला संजय गायकवाड यांनी लोकांना दिला होता.

थोडक्यात बातम्या- 

ऐकावं ते नवलंच! लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी पठ्ठ्याने पळवली बस, अन्….

विनापास गोव्याला चाललेल्या पृथ्वीला पोलिसांनी पकडलं, पाहा पुढे काय घडलं!

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवणं पूनावालांना फायद्याचं की तोट्याचं?; पूनावाला म्हणाले…

गडकरींची कमाल! वर्ध्यातून रेमडेसिव्हीरचा पहिला स्टॉक बाहेर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More