Loading...

‘हा’ माजी आमदार म्हणतो… मी शिवसेनेकडून निवडणूक लढवणारच!

कोल्हापूर | कागल विधानसभा मतदारसंघ नैसर्गिकरित्या शिवसेनेचाच आहे. शिवसेना हा मतदारसंघ भाजपला अजिबात सोडणार नाही. शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा लढवणारच, असा ठाम विश्वास शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे यांनी व्यक्त केला आहे.

कागलमध्ये घाटगे-मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी बोलताना सदाशिव मंडलिक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण साखर कारखानदारीत पुढची वाटचाल करणार असल्याचं घाटगेंनी सांगितलं.

Loading...

कारखानदारी परजिल्ह्यातल्या उसतोड मजुरांवर अवलंबून असते. त्यामुळे पाहिजे तशी अ‌ॅडवान्स रक्कम देऊन त्यांची मनधरणी करावी लागते. त्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. हे चित्र बदलण्याची गरज असल्याचंही घाटगेंनी सांगितलं.

दरम्यान, युतीच्या जागा वाटपादरम्यान कागल विधानसभेची जागा कोणाच्या खात्यात जाणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-पतीच्या चौकशीमुळे चित्रा वाघ घाबरल्या होत्या- शरद पवार

-‘या’ महिला आमदार म्हणतात… शरद पवार हेच आमचे कप्तान!

-“राष्ट्रवादी युवकमध्ये एकलव्य आहेत; साहेबांसाठी अंगठाच काय देहसुद्धा देऊ”

Loading...

-काय उत्तम रित्या परतफेड केलीत; पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना आव्हाडांची चपराक

-‘हा’ आमदार म्हणतो काहीही होऊदे मी मात्र पवारांसोबतच!

Loading...