बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचा आणखी एक नेता म्हणतो, ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

सांगली | माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असं वक्तव्य भाजप नेते संजयकाका पाटील यांनी केलं आहे. ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते.

आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलंय. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संजयकाका पाटील यांच्याआधी भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी असंच वक्तव्य केलं होतं. मावळमध्ये बोलताना काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, याचं उत्तर हर्षवर्धन पाटलांनी दिलं.

दरम्यान, स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही, असं वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल”

“शाहरुख खानने भाजपत प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”

“देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू”

पाकिस्तान टीम इंडियाला नक्की हरवणार- इम्रान खान

‘…तर आम्हाला थेट मॅसेज करा’; पाकिस्तान टीमसाठी झोमॅटोचं ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More