संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

पुणे | भाजपचे राज्यसभेतील सहयोगी खासदार संजय काकडे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याचं समोर आलं आहे. ही भेट काही दिवसांपूर्वी एका विवाहसोहळ्यात झाली होती.

संजय काकडे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळं संजय काकडेे आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळं पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या महिन्यातच संजय काकडे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यांच्या गाडीतून प्रवास देखील केला होता.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडं असल्यानं या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल

-“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

-उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठींबा सपा,बसपाला

-अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

-भाजपकडून कर्नाटकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरु- डी.के.शिवकुमार