बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गुदमरत आहेत, ते लवकरच आघाडीतून बाहेर पडतील”

पुणे | माजी खासदार तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. संजय काकडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

“उद्धव ठाकरे यांना मी चांगला ओळखतो त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे, आज ना उद्या ते नक्की आघाडीतून बाहेर पडतील”, असं वक्तव्य संजय काकडे यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना केलं आहे. दरम्यान, संजय काकडे यांनी केलेल्या या विधानामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे हे जास्त वेळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, गेली 25 वर्ष ते युतीमध्ये होते. त्यामुळे त्यांच्याकडे पाहून मला वाईट वाटत आहे, असंही संजय काकडे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

संजय काकडे यांची काल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मोठं वक्तव्य केलं आहे. संजय काकडे यांनी हे विधान केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्या टीकेवर प्रति टीका करत त्यांना एक सल्ला दिला आहे.

भाजपचं सरकार असताना केवळ सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्या लोकांनी राजकीय गोष्टीवर भाष्य करू नये आणि धंदेबाज लोकांनी राजकारणात पडू नये, त्यांनी त्यांचं कामच व्यवस्थित पाहावं, आम्ही आमचं सरकार कसं चालवायचं ते पाहू असं नवाब मलिक यांनी काकडेंना उद्देशून म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनामुळे ‘या’ भाजप आमदाराचं निधन; आतापर्यंत 4 भाजप आमदार कोरोनाचे बळी

‘…तर मराठा समाज भाजप खासदारांना बघून घेईल’; हर्षवर्धन जाधवांची संतप्त प्रतिक्रिया

“ती 40 पैशांची मोकाट गुरं सरकारची जावई आहेत का?”

तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात गांधी आणि नेहरू घेणार मंत्रिपदाची शपथ

“आम्हाला दोनवेळा निवडून दिलंय, आम्हाला जनतेची काळजी आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More