पुणे | खासदार संजय काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी भाजपवर उघडउघड नाराजी व्यक्त केल्याने ही भेट महत्वाची मानली जात आहे.
शहर आणि राज्य पातळीवर भाजपने आपला वापर करुन घेतला आहे. त्यामुळे मदतीसाठी अजित पवार यांची भेट घेतली, असं काकडे यांनी म्हटलं आहे.
काकडे भाजपचे नसून, ते सहयोगी सदस्य आहेत. त्यांना लोकसभेला संधी मिळाल्यास राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते काय भूमिका घेतील हे जाणून घेण्यासाठी ते आले होते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मला भावासारखे आहेत पण भावानं लाथ मारल्यानंतर दुसरं घर शोधायला लागणार, असं काकडे यांनी काल म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या-
–विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी?
-शिवसेनेचा 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव; अमित शहा-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
–‘भारतरत्न’ स्वीकारण्यास भूपेन हजारिका कुटुंबीयांचा नकार
–संभाजी भिडेंवरील गुन्हे मागं घेतले जातात? ते सरकारचे जावई आहेत का?- नितेश राणे
–हर्षवर्धन जाधव यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं आहे- नितेश राणे