बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजेंचं योगदान काय?; राज्यसभेवर पाठवण्यास संजय काकडेंना आक्षेप

मुंबई | भाजप नेते उदयनराजे भोसले यांना पक्षाकडून राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच भाजपचे राज्यसभेवरील सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवण्यावर आक्षेप घेतला आहे. उदयनराजेंचं भाजपमध्ये योगदान काय? असा सवाल त्यांनी केला आहे.

उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपच्या तिकीटावर लढताना त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांचं पक्षासाठी कोणतंही योगदान नसून एका पडलेल्या उमेदवाराला खासदारकी नको, असं संजय काकडे म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय काकडे यांनी भाजपकडून राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यावेळी सहयोगी खासदार म्हणून नाही तर भाजपचा खासदार म्हणून राज्यसभेवर जाण्याची त्यांची इच्छा आहे.

दरम्यान, भाजपकडून उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु असल्याचं कळतंय. त्यामुळे येत्या काळात कुणाला संधी मिळते हे पाहावं लागेल.

ट्रेंडिंग बातम्या-

पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे; राडेबाज कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंचा दम

21 दिवसात फाशी देऊन पीडितेला न्याय मिळवून देणारा दिशा कायदा महाराष्ट्रात!

महत्वाच्या बातम्या-

देशातील 25 सक्षम महिलांच्या यादीत नववीत राणा यांचा समावेश

बैठ जाओ चचा! स्वरा भास्करने वारीस पठाण यांना घेतलं फैलावर!

मार्चमध्ये लाँच होणार सर्वात स्वस्त आयफोन; जाणून घ्या किंमत?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More