गुजरातमध्ये भाजपचा दारुण पराभव; भाजप खासदाराचा सर्व्हे!

पुणे | गुजरातमध्ये भाजपचा पराभव होईल, इतका दारुण पराभव होईल की कुणाच्या सहकार्यानेही सरकार बनवता येणार नाही, असा दावा भाजपचे पुण्यातील खासदार संजय काकडे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्याने भाजपमध्ये एकच खळबळ उडालीय. 

पुणे महापालिकेत भाजपला कमीत कमी 92 जागा मिळतील, असं भाकीत काकडे यांनी केलं होतं. वास्तवात भाजपला 98 जागा मिळाल्या होत्या. यासाठी जो सर्व्हे केला होता, त्याच निकषांवर गुजरातमध्ये आम्ही सर्व्हे केला, असं काकडे यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, काकडेंचा सर्व्हे खरा ठरणार की नाही हे येणारा काळच सांगले. मात्र भाजपमधील नेत्यांनी मात्र तूर्तास काकडेंच्या या सर्व्हेपासून फारकत घेतली आहे.