बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही”

पुणे | पुण्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता परिस्थिती पुढच्या 10 दिवसांत आणखी वाईट होणार असल्याचं मत भारती हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक तसेच संसर्गजन्य आजारांचे तज्ञ डॉ. संजय ललवाणी यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढच्या दहा दिवसांमधे पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक नसण्याची परिस्थिती येऊ शकते, असंही ललवाणी यांनी सांगितलं आहे. ते लोकमतशी बोलत होते.

लसीकरणामुळे कोरोना होणार नाही अशी शाश्वती नसली तरी देखील लसीमुळे कोरोना सौम्यच होतो, रुग्णाला गंभीर लक्षणे जाणवत नाहीत आणि तो मृत्यूच्या दारात जाण्याची परिस्थिती निर्माण होत नाही, असंही ललवाणी म्हणाले.

सुरुवातीला लॉकडाउन होता. तेव्हा गरीब माणसे आर्थिक अडचणींमुळे बाहेर पडली. त्यांच्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. आत्ता मात्र लॉकडाउन नसल्याने लोक पार्टी तसेच इतर कारणाने भेटत आहेत. त्यामुळे आत्ताचा प्रसार हा मध्यम आणि उच्चमध्यमवर्गात पाहायला मिळत आहे, असं ललवाणी यांनी सांगितलं आहे. 45 वर्षांच्या पुढच्या सर्व लोकांचे सरसकट लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही संजय ललवाणी यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या लॉकडाउन नसल्याने आणि लोक नियम पाळत नसल्याने ही संख्या वाढते आहे. मात्र लॉकडाउन हा पर्याय नाही. तर लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे, असंही ललवाणी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

फेसबुक, मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा काही काळासाठी ठप्प

“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध, तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार”

“राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय शरद पवारच घेतील”

“महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

‘…जबाबदार वाझे’; मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणावर अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More