गेले ते बेंटेक्स,राहिले ते सोने म्हणणारे खासदार स्वत:च शिंदे गटात; ‘या’ कारणामुळे दिला सेनेला धक्का
कोल्हापूर | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर शिवसेना फूटतच गेली. आता शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार जिल्हाप्रमुख आणि अनेक नगरसेवक शिंदे गटात आहेत. तसेच काही खासदार देखील शिंदे यांना समर्थन देत आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी शिंदे गटाला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.
काही दिवसांपूर्वी जे गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते सोने असे म्हणणारे सेनेचे खासदार आता स्वत:च बेंटेक्स होऊन शिंदे गटाचे झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे तीन नेते शिंदे गटात सहभागी झाले. या तिघ्यांच्या विरोधात कोल्हापूर शिवसेनेने आंदोलन केले होते. यात खासदार मंडलिक सुद्धा होते. आता तेच पळाले.
खासदारांनी शिंदे गटात सामिल व्हावे असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शनिवारी त्यासंदर्भात एक बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला राम राम करण्याचा निर्णय झाला. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने येणाऱ्या काळात जास्त निधी आणून मतदार संघाचा विकास करता येईल त्यासाठी त्यांनी बंडाचा झेेंडा हाती घेतला.
केवळ निष्ठा आणि भावनिकतेवर राजकारण करता येत नाही. सत्तेबरोबर राहून विकास करणे महत्वाचे आहे. त्यामुळे खासदार मंडलिक यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या गोटात प्रवेश केला. खासदारांच्या जाण्याने शिवसेनेला करवीर नगरीत मोठे खिंडार पडले आहे. आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मंडलिकांवर कोणती कारवाई करणार हे पाहाणं महत्वाचं ठरेल.
थोडक्यात बातम्या –
‘मी तर स्वत:लाच मुख्यमंत्री समजतो’, शिंदे गटातील आमदाराचं मुख्यमंत्र्यांसमोरच मोठं वक्तव्य
‘गोल्ड डिगर’ म्हणणाऱ्यांना सुष्मिता सेनने झाप झापलं, म्हणाली…
‘शरद पवार म्हणाले आणि आम्ही विरोधी बाकांवर बसलो’, जितेंद्र आव्हाडांनी सांगितली ‘ती’ आठवण
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सज्ज
Comments are closed.