बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ फॅक्टर जोरात; शिवसेनेची जोरदार मुसंडी

कोल्हापुर |  कोल्हापुरातून राष्ट्रवादीला धक्का देणारे कल येत आहेत. ‘आमचं ठरलंय’ फॅक्टर जोरात चालला आहे… सध्या तरी असंच म्हणावं लागेल. कारण राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक तब्बल मतांनी 63 हजार पिछाडीवर आहेत.(सकाळी 11.30 वाजता)

धनंजय महाडिक यांना काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी उघड विरोध केला होता. खुद्द शरद पवारांनी सांगूनही पाटलांनी त्यांचं ऐकलं नाही.

माझ्या मताधिक्यामध्ये सतेज पाटलांचा मोठा वाटा आहे, असं स्वत: शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक म्हणाले आहेत. त्यांच्या याच वक्तव्याने आमचं ठरलंय…’! या फॅक्टरला दुजोरा मिळाला आहे.

दरम्यान, कोल्हापुरकरांनी काय ठरवलंय?? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या

-निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

-नरेंद्र मोदी वाराणसीतून 1 लाख 73 हजार मतांनी आघाडीवर

-कन्हैया कुमारला धक्का; गिरिराज सिंह ‘इतक्या’ मतांनी आघाडीवर

-नगरमध्ये सुजय विखेंची गाडी सुसाट…; संग्राम जगतापांचं टेन्शन वाढलं

-पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंना फोन करुन सांगितली प्रीतम यांची आघाडी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More