मुंबई | मुंबई महापालिकेने कंगणाच्या कार्यालयावर कारवाई केली. यावरून भाजपने आणि कंगणाच्या चाहत्यांनी मुंबई महापालिकेवर तसेच सरकारवर सडकून टीका केली आहे. मात्र काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी कंगणा भाजपच्या संपर्कात असू शकते, ती भाजपच्या सांगण्यावरूनच हे सर्व करत असेल, असं म्हटलंय.
सरकारमध्ये बसून आपण अशी कामं करू शकत नाही. यामुळे अतिशय चुकीचा संदेश जात आहे. भाजपच्या सांगण्यावरूनच हे सर्व करत असेल. मात्र एक राजकीय पक्ष तो सत्ताधारी पक्ष अशा जाळ्यात अलगद अडकत आहे?, असं संजय निरूपम यांनी म्हटलं आहे.
कंगणाच्या कार्यालयावर कारवाई केल्यावर कंगणा जास्त आक्रमक झाली असून तिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून कंगणा राणावतने सुरूवातीपासूनच एल्गार पुकारला होता. कंगणा तिच्या वक्तव्याने चांगलीच चर्चेत होती. मात्र त्यावेळी कंगणाने थेट मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे ती चांगलीच गोत्यात आली आणि टीकेची धनी ठरली.
महत्वाच्या बातम्या-
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन
इतकं प्रेम होतं तर त्याला ड्रग्स कसं घेऊ दिलं?- अंकिता लोखंड
बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे- कंगणा राणावत
राज्यावर, देशावर गंभीर संकट असताना राजकारण केलं जात असेल तर ते….- रोहित पवार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध
Comments are closed.