“पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका”

मुंबई | पानिपतचं युद्ध विजयासाठी नाही तर पराभवासाठी ओळखलं जातं हे विसरु नका, असं म्हणत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमित शहा यांना चिमटा काढला आहे. त्यांनी ट्विटकरुन असं म्हटलं आहे.

आगामी लोकसभा निवडणूक पानिपतसारखी असून ती भाजपसाठीच नव्हे तर देशासाठी निर्णायक असेल, असं अमित शहा म्हणाले होते. यावर निरुपम यांनी हा खोचक टोला लगावला आहे.

भाजपला पराभवाची चिंता वाटते का? असा प्रश्नही त्यांनी भाजपला विचारला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतय.

महत्वाच्या बातम्या-

-मायावती-आखिलेशांची ‘काँग्रेस’ बरोबर युती नाही मात्र अमेठी-रायबरेलीत काँग्रेसला साथ

-आजच्या सामन्यात भारतीय संघाला झालंय तरी काय??

-आमची युती झाल्यानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झाेप उडाली- मायावती

-“आलोक वर्मांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा नाही, त्यांना हटवण्याचा निर्णय घाईगडबडीचा”

-“जे 60 वर्षात झालं नाही ते गेल्या साडे चार वर्षात झालं”