बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ नेत्याची पक्ष सोडून जाण्याची धमकी!

मुंबई |  उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असताना काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावर प्रचंड संताप व्यक्त केला असून काँग्रसला सोडचिठ्ठी देण्याची धमकी दिली आहे. निरुपम यांच्या या धमकीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तिकीट वाटपात आपल्या समर्थकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.निरुपम यांनी एक ट्विट करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाला माझ्या सेवेची गरज उरलेली दिसत नाही, असं निरूपम यांनी म्हटलं आहे.

मुंबईत विधानसभा निवडणुकीचं तिकीट वाटप सुरू असून त्यात मी काही लोकांच्या नावांची शिफारस केली होती. मी दिलेली नावं वगळण्यात आल्याचं मला समजलं आहे, असं निरूपम म्हणाले.

निवडणूक प्रचारात भाग घेणार नसल्याचं मी पक्ष नेतृत्वाला कळवलं आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे, असं निरुपम यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More