मुंबई | मनसेच्या फेरीवालाविरोधी खळखट्ट्याक आंदोलनावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जाेरदार टीकास्त्र सोडलंय. हे आंदोलन फक्त परप्रांतिय फेरीवाल्यांविरोधात असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केलाय.
१५ दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी धमकी दिली होती. मात्र मुख्यमंत्री बांगड्या भरुन बसले आहेत. १५ दिवसात त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं निरुपम म्हणाले.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी गरीब फेरीवाल्यांवर हल्ला चढवला. पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं या गुंडगिरीला समर्थन असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
Comments are closed.