काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नाना पाटेकरांचे आभार मानले

मुंबई | मनसेच्या विरोधात आणि फेरीवाल्यांच्या बाजूने वक्तव्य करणारे अभिनेते नाना पाटेकर यांचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आभार मानले आहेत. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केलेत.

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या समस्या आणि त्यांचा संघर्ष समजून घेतला त्याबद्दल त्यांचे आभार, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय.

मुंबईतील व्हीजेटीआयच्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी मनसेवर निशाणा साधला होता. भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता?, असा सवाल त्यांनी विचारला होता.