बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणं हा महाराजांचा अपमान आहे”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगणा राणावतवर टीका करताना ‘हरामखोर मुलगी’ या शब्दाचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. काँग्रेस नेते संजय निरूपम यांनीही संजय राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

कंगणाने मुंबईबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे त्याचा आम्ही विरोध करतो पण शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, असं निरुपम यांनी म्हटलंय.

कंगणाने मुंबईबद्दल जे भाष्य केलं ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कंगणावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची नीचता, असा घणाघात संजय निरूपम यांनी केला आहे.

दरम्यान, छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणं हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे, असं निरूपम म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

सरकार देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात…!

आचार्य अत्रेंच्या कन्या प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

“महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा”

भारतात सर्वात जास्त विकली जाणारी ‘टाटा नेक्सॉन’ पहिली इलेक्ट्रिक गाडी!

मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या….- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More