महाराष्ट्र मुंबई

‘पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा’; काँग्रेस नेत्यानंच सरकारला सुनावलं

मुंबई | राज्य सरकारनं राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा असल्याचं निरूपम यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारचा पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय निव्वळ मुर्खपणाचा आहे. एका आठवड्यात दोन सुट्या देण्याला अर्थ काय?, असं म्हणत संजय निरूपम यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सरकारी कर्मचारी त्यांच्या आळशीपणामुळे प्रसिद्ध आहेत. सरकार त्यांच्या कामचुकारगिरीला बक्षिस देत आहे का?, असा सवाल संजय निरूपम यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच दिवसांच्या आठवड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र या निर्णयावरून सरकारमधील काही नेत्यांनीच नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

केजरीवालांच्या ताफ्यात ‘मराठी’ नाव; वडील अजूनही चालवतात पंक्चरचं दुकान

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने उदयनराजे आक्रमक

महत्वाच्या बातम्या- 

सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्य टाळा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

गुन्हेगारांना उमेदवारी देण्याची कारणं वेबसाईटवर टाका- सर्वोच्च न्यायालय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या