Top News

“शिवसेना बदललेली नाही, आजही गुंडा पार्टीच आहे”

मुंबई | मुंबईमध्ये कांदिवली येथील नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेचे दोन शाखाप्रमुख आणि चार शिवसैनिकांनी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी सेनेवर निशाणा साधत आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना ते बोलत होते.

माजी अधिकाऱ्याला मारहाण ही सरकर पुरस्कृत गुंडगिरी आहे. शिवसैनिकांना राज्य सरकार आणि पोलिसांकडून अभय दिलं जात आहे मात्र हे धोकादायक आहे. शिवसेना ही गुंडा पार्टी असून त्यांचं पितळ आता उघडं पडलं आहे. त्यांचा गुंडगिरीवरच विश्वास असल्याचं या घटनेवरून दिसल्याचं संजय निरूपम यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांना शिवसेनेसोबत सत्तेत राहण्यासाठी धन्यता वाटत आहे ते शिवसेनेचं ओझं काँग्रेस कधीपर्यंत सहन करणार आहे हे विचारायला हवं, असं म्हणत निरूपम यांनी सेनेवर निशाणा साधत आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

दरम्यान, नौदलाच्या अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे सध्या शिवसेनेवर विरोधी पक्षाने टाकेची झोड उठवत संबंधित शिवसैनिकांवर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मी माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो….’; नाथाभाऊंनी केला मोठा गौप्यस्फोट

“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिली”

चिंताजनक! पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा

‘मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीतील फ्लॅट बळकावला’; भाजपचा गंभीर आरोप

अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; मुंबई लोकलने करता येणार प्रवास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या