Top News महाराष्ट्र मुंबई

‘मुख्यमंत्र्यांनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी सरकारी दवाखान्यांकडे …’; काँग्रेस नेत्याचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई | भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शहरांची नाव बदलण्यावर जोर देण्याऐवजी जर सरकारी रूग्णांलयांकडे लक्ष दिलं असतं तर बालकांना आपला जीव गमवावा लागला नसता, असं संजय निरूमप यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

औरंगाबादच्या नामंतरावरून सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण तापलेलं दिसत आहे. शिवसेनेने औरंबादच्या नामंतराला आपला पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसने याला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, संजय निरूपम यांच्या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे निधन

…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे

“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”

“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”

मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या