Top News विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका राम मंदिर मुद्द्यावर होतील?; काँग्रेस नेत्याला संशय

मुंबई | महाराष्ट्रात सत्तास्थापनेचं अजूनही भिजतं घोंगडं आहे. भाजप सत्तास्थापनेचा दावा सद्यपरिस्थितीत करणार नाही, असं कळतंय. तर शिवसेनेने राज्यपालांच्या भूमिकेवर आम्ही लक्ष ठेवून आहे, असं म्हटलंय. दुसरीकडे अशा परिस्थितीत महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूका राम मंदिर मुद्द्यावर होतील का?, असा संशय काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी व्यक्त केलाय.

ज्या अयोध्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय तो निकाल उद्या लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उद्या सकाळी 10.30 वाजता निकाल सुनावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती लक्षात घेऊन निरूपम यांनी शंका व्यक्त करणारं ट्वीट केलं आहे.

देशात सर्वात अतिसंवेदनशील असं अयोध्या प्रकरण आहे. गेल्या चाळीस दिवसात या प्रकरणाची जलद सुनावणी घेण्यात आली होती. आता उद्या हा निकाल लागतो आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेने सेना-भाजपला स्पष्ट बहुमत देऊनही मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्ष अडून बसल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या