तुमच्या वक्तव्यांमुळे आम्ही मार खातो, डायलॉगबाजी बंद करा, संजय निरुपमांना फटकारलं

मुंबई | उत्तर भारतीयांचा तुम्ही ठेका घेतलेला नाही. तुमच्या भडकाऊ वक्तव्यांमुळे मुंबईत उत्तर भारतीय मार खात आहेत. अगोदर डायलॉगबाजी बंद करा, अशा शब्दात उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना फटकारलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 डिसेंबरला एका कार्यक्रमात उत्तर भारतीयांना संबोधित करणार आहेत. उत्तर भारतीय महापंचायतीने राज ठाकरे यांना यासाठी निमंत्रण दिलं होतं. ”आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आणि ते त्यांनी आमचा मान राखत स्वीकारलं. राज ठाकरे आम्हाला संबोधित करतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.

उत्तर भारतीय आणि मराठी माणूस एकत्र आहे तर तुमच्या पोटात का दुखतंय. मराठी माणूस हा आपला शत्रू आहे हा कचरा डोक्यात भरलाय तुम्ही, आम्ही हेच दूर करतोय तर का पोटात दुखतंय? परत काही बोललात तर पुढची भेट थेट रस्त्यावर होईल,” असा इशारा विनय दुबे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार

-वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!

-मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस

-ओवेसीसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी!

-भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली; ‘या’ खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य