Top News महाराष्ट्र मुंबई

‘सरकार तीन पक्षांचं आहे शिवसेनेने विसरून नाही चालणार’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शिवसेनेला इशारा

मुंबई | औरंगाबदच्या नामांतरावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. काँग्रेसने आपला नामांतराला जाहीरपणे विरोध असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र स्व. बाळासाहेबांचं  बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं त्यामुळे ते पूर्ण करणार असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेला इशारा देणारं वक्तव्य केलं आहे.

औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुनाच कार्यक्रम आहे. मात्र सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही. आघाडीची सरकारं किमान समान कार्यक्रमांवर चालतात, असं संजय निरूपम यांनी म्हटलं आहे.

कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमावर नाही. किमान समान कार्यक्रम काम करण्यासाठी तयार केला आहे. नाव बदलण्यासाठी नसल्याचं म्हणत संजय निरूपम यांनी शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

दरम्यान, औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. नामकरणाला आमचा कायम विरोधच राहणार असल्याचं अशोक चव्हाण यांनीही म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज केवळ हिंदूंचे राजे नव्हते ते अठरापगड जातींचे राजे होते”

रोहित शर्माची एक चूक आणि भारताचे 5 खेळाडू आयसोलेशनमध्ये

“औरंगाबादचे नामांतर महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही, आमचा कायम विरोधच”

लेडी PSI ची आत्महत्या; पत्रात लिहिलं ‘हे’ कारण!

“भाजपची लस घेऊ शकत नाही, त्यांच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या