मुंबई | भाजप प्रदेशचे उत्तर भारतीय मोर्चेचे अध्यक्ष संजय पांडे यांनी टिपू सुलतानच्या जयंतीवरुन शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
शिवसेना टिपू सुलतानची जयंती साजरी करणार असल्याचं वृत्त ऐकून मोठा धक्का बसला, असं म्हणत संजय पांडे यांनी शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी, असा टोला लगावला आहे.
ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांना हिंदुत्वासाठी लढणं शिकवलं, त्याच शिवसेनेने टिपू सुलतानची जयंती साजरी करावी यासारखी दुःखदायक गोष्ट नाही, असं म्हणत संजय पांडे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.
सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना औरंगजेबाची जयंतीही साजरी करायला शिवसेना मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये पांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील- उद्धव ठाकरे
कांगारूंचा पराभव केल्याने पंतप्रधान मोदींचीही भारतीय संघावर कौतुकाची थाप; म्हणाले..
अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांवर रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…
ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यानं भारताच ‘हे’ मॅसेजिंग अॅप कायमचं होणार बंद
‘गाबा’चा घमंड उतरवलाच! भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकली मालिका