बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जनतेने सहकार्य करावं, आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही”

मुंबई | राज्यात संचारबंदी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाच पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला एक आवाहन केलं आहे. राज्यात 144 कलम लागू होत आहे. त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही, असं संजय पांडे म्हणाले.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलं आहे.

आम्हाला कारवाई करायची नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. पण कुठे तरी जाळपोळ, पब्लिक प्रॉपर्टी नासधूस होत असेल तर आम्ही काहीच करणार नाही असा याचा अर्थ नाही. असं काही चित्रं दिसलं नाईलाजाने आम्हाला बळाचा वापर करावा लागेल, असा इशाराही संजय पांडे यांनी दिला आहे.

मोठ्या देशांनी लॉकडाऊन केलंय. आपल्याला ते नवं नाही. आपणही नियमांचं काटेकोर पालन केलं तर येत्या 15 दिवसात कोरोनाचे आकडे कमी होतील, असंही संजय पांडे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“बंद काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील”

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं”

कोहलीनं शाहबाज अहमदला चेंडू सोपवला अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला

“आपण कुणाच्या भानगडीत पडत नसतो, आपला नाद करायचा नाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More