Top News पुणे

“बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, पण आता… “

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधलाय. ठाकरे सरकार पाच वर्ष टिकेल संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू हे पुणे राहिलंय. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो केंद्रबिंदू मुंबईत होता.

अनेक काळ देशाचं तसंच राज्याचं राजकारण हे बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं आणि बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.

“महाविकास आघाडी सरकार होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं. हे सरकार 15 दिवसांत कोसळेल अशा काही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. पण सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. हे सरकार पूर्ण ताकदीने चाललं आहे आणि 5 वर्ष टिकेल,” असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

मुख्यमंत्र्यांवर 12 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप, राज्यपालांकडे चौकशीची मागणी

विधानपरिषदेसाठी उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेला होकार!

‘मी 3 वर्षांची असताना….’; अभिनेत्री फातिमा सना शेखचा खळबळजनक गौप्यस्फोट

“भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही”

“कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणं महाराष्ट्राला शोभत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या