Top News महाराष्ट्र वाशिम

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…

Photo Courtesy- Twitter/Sanjay Rathod

वाशिम | पूजा चव्हाण प्रकरणावर शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोहरादेवी या गोर बंजारा समाजाच्या काशी मानल्या जाणाऱ्या धार्मिक क्षेत्रावर जाऊन त्यांनी आधी दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. तसेच त्यांच्या हजारो समर्थकांनी याठिकाणी गर्दी केली होती. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या आरोपासंदर्भात मौन सोडलं.

नेमकं काय म्हणाले संजय राठोड वाचा जसंच्या तसं-

पूजा चव्हाण या आमच्या गोर बंजारा समाजातील मुलीचं पुण्यात निधन झालं, त्या मृत्यूबद्दल संपूर्ण समाजाला दुःख झालं आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात मी आणि आमचा संपूर्ण समाज सहभागी आहे. परंतू या घटनेवरुन संपूर्ण महाराष्ट्रभर जे घाणेरडं राजकारण केलं जातंय ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे.

बंधूंनो मी विमुक्त भटक्या जमातीतून, ओबीसी समाजाचं नेतृत्त्व करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या गेल्या 30 वर्षाच्या सामाजिक वैयक्तिक आणि राजकीय जीवनाला नष्ट करण्याचा प्रकार आपण सर्वांनी पाहिलेला आहे. बंधूंनो आपण सर्वजण प्रसारमाध्यमं किंवा समाजमाध्यमं यातून जे सांगण्याचा प्रयत्न केला, मी खात्रीनं सांगू शकतो की यात अजिबात तथ्य नाही.

आपल्या सर्वांना मी विश्वासानं सांगू शकतो, की याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे, या चौकशीद्वारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासातून साऱ्या गोष्टी स्पष्ट होती. मात्र गेल्या 10 दिवसांपासून माझ्याबद्दल जे घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, माझी, माझ्या कुटुंबाची तसेच माझ्या समाजाची कृपा करुन बदनामी करु नका.

मी गेल्या 10 दिवसांपासून आपल्या सर्वांचं प्रेम पाहात होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. आई-वडिलांना तसेच पत्नीला सांभाळण्याचं काम मी या दिवसांमध्ये करत होतो तसेच सरकारी कामं करत होतो. मी कुठंही गेलेलो नव्हतो. आता मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की चौकशीत सगळं बाहेर येईल.

पूजा चव्हाणसोबतच्या त्या व्हायरल फोटोंवर काय म्हणाले?

फोटो सोशल मीडियावर आपण सर्वजण पाहतो. माझ्या समाजाचं प्रेम माझ्यावर आहे, अनेकजण याठिकाणी फोटो काढतात. मी 30 वर्षांपासून काम करतोय, एका घटनेमुळं मला चुकीच्या बॉक्समध्ये उभं करु नका.  मी आणि माझा समाज दुःखी आहे. मात्र या प्रकरणावरुन जे राजकारण केलं जातंय ते अत्यंत घाणेरडं आहे. माझ्या विरोधातील कुठल्याही आरोपात तथ्य नाही.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली

लाईट्स… कॅमेरा… अ‌ॅक्शन…. धाड टाकताच समोरील प्रकार पाहून पोलीसही हादरले!

कोरोना नेत्यांची पाठ सोडेना, आता ‘या’ बड्या नेत्याचीही टेस्ट पॉझिटिव्ह

“चालक कार चालवत होता आणि धावत्या कारमध्ये मालक बलात्कार करत होता”

‘सैराट’मधल्या आर्चीचा भन्नाट लूक व्हायरल, फोटो पाहून हजारो लोक झालेत फिदा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या