वाशिम | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीच्या दर्शनाआधीच मोठा धक्का बसला आहे. संजय राठोड यांनी सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं, अशी सूचना पोहरादेवी पीठानं केली आहे. पोहरादेवी गडाचे महंत जितेंद्र महाराज यांनी याबाबत भाष्य केलं आहे, ते मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाशी बोलत होते.
दुसरीकडे पोहरादेवी पीठानं संजय राठोड यांना समर्थन दिलं आहे. बहुजन समाजाचा एखादा नेता जेव्हा मोठा होत असतो, तेव्हा त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यासाठी अनेक प्रयत्न तसेच कट रचले जातात. संजय राठोड यांना देखील संपवण्याचा कट होता, असं येथील सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत आम्ही सर्व संत महंतांनी शोक व्यक्त केला आहे. याबाबत सखोल चौकशी केली जावी, जेणेकरुन सत्य बाहेर येईल. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, चौकशीअंती जे सत्य बाहेर येईल ते आम्हाला मान्य असेल, असं येथील सुनील महाराज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राठोड यांना पोहरादेवी पिठानं चौकशीला सामोरं जाण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रकरण बाहेर आल्यापासून संजय राठोड गायब झाले होते, ते आज पोहरादेवीला येणार असून शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं देखील बोललं जात आहे, मात्र चौकशीला सामोरं जाण्याच्या सूचना म्हणजे संजय राठोडांच्या अडचणीत वाढ, असं मानलं जात आहे.
थोडक्यात बातम्या-
सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीला लागली लाॅटरी, देणग्यांमध्ये इतक्या पटींची वाढ!
प्रेमसंबंध माझ्यासोबत अन् पाहते दुसऱ्याकडे, त्यानं उचललेल्या पावलानं ठाणे हादरलं!
मुंबईत खासदाराची आत्महत्या, अधिकारी व बड्या मंत्र्यांची नावं लिहून ठेवल्यानं खळबळ
आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली
कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल