बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर राज्यपालांचा मोठा निर्णय

मुंबई  | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. अखेर तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला असून तो राज्यपालांनी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.

पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने पुण्याच्या वानवडी भागातील एका इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा करणाऱ्या अनेक ऑडिओ क्लिप्सही समोर आल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणीसोबतचे संजय राठोड यांचे धक्कादायक फोटोही समोर आले होते.

भाजपने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मोठा हायहोल्टेज ड्रामा घडला होता. अखेर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केल्यानंतर सरकारवर दबाव वाढत गेला आणि 28 फेब्रुवारी रोजी संजय राठोड यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.

दरम्यान, राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर तो अद्याप मंजूर न करण्यात आल्यानं भाजप पुन्हा आक्रमक होण्याची चिन्हं दिसत होती. चित्रा वाघ यांनी या प्रकरणी राठोड अजूनही मंत्रिपदावर असल्याचा दावा करत आरोप करायला सुरुवात केली होती. तोच राज्यपालांकडे हा राजीनामा पोहोचला असून त्यांनी तो मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

बेन स्टोक्सला विराट भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ

…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा

‘देशाची संपत्ती विकणं चुकीचं’; सोनिया गांधींचा नरेंद्र मोंदींवर निशाणा

इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी’, पाहा व्हिडिओ

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More