वाशिम | गेल्या 14 दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात होतं. 8 फेब्रुवारीला पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केली होती. यामध्ये राठोडांचं नाव घेतलं जात होतं मात्र राठोडांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावर राठोडांनी आज पोहरादेवी या गोर बंजारा समाजाच्या काशी मानल्या जाणाऱ्या धार्मिक क्षेत्रावर जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं.
तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी 14 दिवसांपासून नाही तर 10 दिवस माध्यामांपासून लांब होतो. प्रसारमाध्यमांमध्ये ज्या पद्धतीने माझी बदनामी होत होती त्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आई-वडिलांसोबत, पत्नी आणि मुलांसोबत मी थांबलो होतो, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. आई-वडिलांना तसेच पत्नीला सांभाळण्याचं काम मी या दिवसांमध्ये करत होतो तसेच सरकारी कामं करत होतो. मी कुठंही गेलेलो नव्हतो. मी एवढच सांगतो की मला आता या प्रकरणावर काही बोलायचं नसून जे काही सत्य आहे ते चौकशीतून बाहेर येईल, असं राठोड म्हणाले.
दरम्यान, पूजा चव्हाणसोबतच संजय राठोड यांचे जे काही फोटो व्हायरल झाले होते त्यावरही राठोडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर माझ्या समाजाचं प्रेम आहे त्यामुळे अनेकजण फोटो काढतात. मी 30 वर्षापासून काम करत आहे त्यामुळे एका घटनेमुळे मला चुकीच्या बॉक्समध्ये उभं करु नका, असंं आवाहनही संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी धोका, असं म्हणत शेतकरी बाप-लेकानं संपवलं आयुष्य
सेक्स कॉल… अभिनेते, नेते, खेळाडूंना मोठा धोका; पोलिसांची धडक कारवाई
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार?, ‘या’ माणसाचा सल्ला मोदी ऐकणार का?
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड काय म्हणाले?, वाचा जसंच्या तसं…
राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची रुपाली चाकणकरांनी उडवली खिल्ली