नागपूर | बंजारा समाजालाही धनगर समाजाच्या सवलती लागू करण्याची मागणी राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली आहे. धनगर समाजाला सवलती दिल्या असतानाच दुसरीकडे बंजारा समाजदेखील अस्वस्थ झाला आहे, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शिफारस करून केंद्राला सांगितलं मात्र अद्याप काहीही झालेले नाही. आता त्वरीत बंजारा समाजाला देखील धनगर समाजाच्या सर्व सवलती लागू कराव्यात, असंही ते म्हणाले.
पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने देखील ही मागणी केली होती. बंजारा समाज देशात एकूण 15 करोड तर राज्यात 1 कोटींपेक्षा जास्त आहे, असं राठोड म्हणाले.
दरम्यान, शनिवारी धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती लागू करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवार हे राजकारणातील दिलीपकुमार- पंकजा मुंडे
–जेव्हा ‘कूल’ धोनी केदार जाधववर रागावला होता तेव्हा…
-हैदराबाद एकदिवसीय सामन्यात झालेत ‘हे’ अफलातून रेकाॅर्ड!
-तमन्ना म्हणते, मी फक्त ह्रतिकसोबत चुंबन दृश्य करण्यास तयार!
–धोनी जे सांगतो, ते मी डोळे बंद करुन करतो- केदार जाधव
Comments are closed.