वाशिम | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. याप्रकरणात भाजपने शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. अद्यापही संजय राठोड समोर आले नव्हते यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. संजय राठोड कधी समोर येणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. आता मात्र संजय राठोड यांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा संपली आहे.
गेले 14 दिवस संजय राठोड नॉट रिचेबल होते. ते सरकार मधील अनेक मंत्र्यांच्या संपर्कात असल्याची माहिती स्वत: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली होती. संजय राठोड त्यांच्या परिवारासह पोहरादेवी देवस्थान येथे येणार असल्याची माहिती देवस्थानच्या महंतांनी दिली होती. यावर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाने शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे उद्या संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबद्दल काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता संजय राठोड त्यांच्या यवतमाळ येथील निवास्थानावरून परिवारासह पोहरादेवी येथे जाण्यास रवाना होणार आहेत. 11.30 वाजता पोहरादेवी येथील देवस्थानचे दर्शन घेतल्यानंतर संजय राठोड 1 तास तिथेच थांबणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संजय राठोड दारव्हा तालुक्यातील धामणगाव येथील देवदर्शनासाठी जाणार आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार असल्यीचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, संजय राठोड उद्या पोहरादेवी येथे जाणार असल्याची माहिती मिळताच पत्रकारांनी त्यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी जाऊन राठोडांची प्रतिक्रिया जानून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संजय राठोड अजूनही पडद्याआड असल्याने त्यांची कोणतीही प्रतिक्रिया मिऴू शकली नाही.
थोडक्यात बातम्या-
‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका
ऑनलाईन मागवली कोल्डड्रिंक अन् बाटलीत निघाली…; तुम्हालाही वाचून बसेल धक्का!!!
शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन
आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत- नवनीत राणा
तुमच्या उपस्थित शिवनेरीवर मास्कची ढाल गेली कुठे?; भाजपचा उद्धव ठाकरेंना सवाल