बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोप करणाऱ्यांना संजय राठोडांचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई | इतक्या दिवस रखडलेला मंत्रिमडळ विस्तार अखेर मंगळवारी पार पाडला. मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वीही राजकारणात अनेक आरोप-प्रत्यारोप सुरूच होते. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी राजकारणातले वाद मात्र अद्याप सुरूच आहेत. नव्या मंत्रिमंडळात काही आरोप असलेले नेते देखील आहेत, त्यातील एक म्हणजे संजय राठोड(Sanjay Rathod). यावर आता भाजप(BJP) नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) ह्या राठोड यांच्यावर चांगल्याच भडकल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटल होत की, जरी राठोड मंत्री झाले असले तरी आमचा त्यांच्या विरोधातला लढा सुरूच असेल, असं म्हणत त्या राठोड यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. आता यावर राठोड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला पोलीसांनी क्लिन चीट दिल्यानंतर मी मंत्री झालो आहे. या पुढे जर कोणी माझ्यावर आरोप करेल, तर त्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राठोड यांनी टीका करणाऱ्यांना दिला आहे.

मी चार वेळा मोठ्या मताने निवडून आलो आहे, आता मला मंत्री पदाची संधी मिळाली आहे, गेल्या वेळीही मिळाली होती. एक घटना दुर्दैवी झाली, त्यावरून आरोप करण्यात आले. नैतिक जबाबदारी समजून, चौकशी व्हावी यासाठी उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) राजिनामा दिला. चौकशीनंतर पोलिसांनी मला क्लिन चीट दिली आहे, असंही राठोड म्हणाले.

तसेच चित्राताईंना सर्व कागदपत्रे पाठवू, त्यांना माहित नसेल. याचा त्रास समजून घ्यावा ही सर्वांना विनंती. आतापर्यंत शांत होतो, यापुढे कायदेशीर मार्ग अवलंबणार, असा इशारा राठोड यांनी टीका करणाऱ्यांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

वरूण गांधीचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर, ‘या’ मुद्द्यावरून घेतला खरपूस समाचार

राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर

“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखेंनी सर्वप्रथम घेतली शपथ

राज्यातील ‘या’ भागांना अलर्ट जारी, पुढील 4 तास पाऊस झोडपून काढणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More