बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

यवतमाळ | शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच या सर्व प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारही मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं दिसून आलं. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. सरकारमध्ये अशा धडाडीच्या लोकांची गरज आहे. त्यामुळे राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी हे वक्तव्य केल्याचं वृत्त आहे.

केंद्र सरकारने लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. परंतू काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्यानं नागरिकांना परत जावं लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यवतमाळला केंद्र सरकारने दिलेल्या 35 पैकी 14 व्हेंटिलेटर बंद पडले. केंद्राकडून लशीचा पाहिजे तसा पुरवठा होत नसल्यानं अशी परिस्थिती निर्माण होत आहे, अशी टीका देखील उदय सामंत यांनी केली आहे.

दरम्यान, अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट करून मी मंत्री पदापर्यंत पोहोचलो, पण महाराष्ट्रातील अतिशय घाणेरड्या राजकारणामुळे मला माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हे खूप दुर्दैवी आहे. असं मत संजय राठोड यांनी व्यक्त केलं होतं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

थोडक्यात बातम्या-

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

“मुख्यमंत्र्यांना तीन पत्र लिहिली, उद्धव ठाकरे विसरभोळे झालेत की काय?”

‘…तोपर्यंतच आम्ही विरोधात बसणार आहोत’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

भारत-श्रीलंका मालिकेवर कोरोनाचं सावट; वनडे आणि टी 20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल

“कोरोनापासून कधीच सुटका होणार नाही, तो पूर्णपणे आपल्यातून जाणार नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More