Top News महाराष्ट्र राजकारण वाशिम

संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता

Photo Courtesy -Youtube/ greatbanjara & Facebook/ sanjay rathod

वाशिम | शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड तब्बल 15 दिवसांनंतर सर्वांसमोर येणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे. संजय राठोड यांच्या विरुद्ध भाजप आक्रमक झाली होती. त्यानंतर राठोड माध्यमांसमोर आले नाहीत. आता संजय राठोड सर्वांसमोर येऊन शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. आज संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती देवस्थानचे जितेंद्र महाराज यांनी दिली आहे.

संजय राठोड नेहमी आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर पोहरादेवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे आज संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला येणार आहेत. आम्ही लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन केलं आहे. मात्र तरीही 15 ते 20 हजारांची गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी सोशल डिस्टंन्सींग पाळावे, असे आवाहन जितेंद्र महाराज यांनी केले आहे.

दरम्यान, पोहरादेवी मंदिराच्या स्टेजवरून संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड साडेआकरा वाजण्याच्या सुमारास सहपरिवार देवीच्या दर्शनाला उपस्थिती राहणार आहे. 15 ते 20 हजार लोक जमण्याची शक्यता असल्याने सोशल डिस्टंन्सींगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाद्वारे पोहरादेवी मंदिराच्या आवारात जमण्याचा मेसेज देखील पाठवला जात आहे.

याशिवाय, पोहरादेवी मंदिराच्या आवारात एक स्टेज देखील उभारण्यात आलं आहे. स्टेज भाषणासाठी उभारण्यात आला नाही, मात्र वेळ पाहून निर्णय घेण्यात येईल, असे महाराजांनी सांगितले आहे. याशिवाय पोहरादेवी मंदिराच्या आवारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. जागोजागी बॅरिकेटस लावण्यात आले आहे. याशिवाय बाॅम्ब शोधक पथक दाखल झालं आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न असेल.

थोडक्यात बातम्या-

चौकशीला सामोरे जा!; पोहरादेवीच्या दर्शनाआधीच संजय राठोड यांना मोठा धक्का

सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीला लागली लाॅटरी, देणग्यांमध्ये इतक्या पटींची वाढ!

प्रेमसंबंध माझ्यासोबत अन् पाहते दुसऱ्याकडे, त्यानं उचललेल्या पावलानं ठाणे हादरलं!

मुंबईत खासदाराची आत्महत्या, अधिकारी व बड्या मंत्र्यांची नावं लिहून ठेवल्यानं खळबळ

आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या