Sanjay Raut | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली. ते सध्या डॉक्टरांच्या निगराणी खाली रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे देखील दिसून येत आहे. अशात आज त्यांचा एक फोटो पक्षाकडून ‘एक्स’वर पोस्ट करण्यात आला असून त्यात ते आता ठिक असल्याचं सांगण्यात आलंय. (Sanjay Raut)
याचबरोबर प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ देखील फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी, विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार , असं वक्तव्य केलंय. याच व्हिडिओवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचं विधान केलं आहे. आज (2 नोव्हेंबर) संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
“सर्वप्रथम, तर माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या प्रकृतीत आराम पडावा म्हणून त्यासाठी शुभेच्छा देतो. आम्हाला सगळ्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता आहे, काळजी आहे. त्यांचे वक्तव्य मला कोणीतरी सांगितलं, पण ते सत्त्यावर आधारित नाही. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. आंबेडकर साहेबांनी भ्रम निर्माण करणारी वक्तव्य ICU मधून करू नये.”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.
तसंच पुढे ते म्हणाले की, “सध्या ते ICU मध्ये आहेत, त्यामुळे छातीवर ताण येईल अशी वक्तव्य त्यांनी ICU मधून करू नये. ही खूप नाजूक शस्त्रक्रिया असते मी त्यातून दोन-तीन वेळा गेलेलो आहे. त्यांनी जास्त बोलू नये. त्यांनी अगोदर आपली प्रगती सांभाळावी महाराष्ट्र आम्ही सांभाळतो.”
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?
प्रकाश आंबेडकरांचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये ते म्हणाले की, “मी सध्या आयसीयूमध्ये आहे. माझ्यावर अँजिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झालेली आहे. डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलेलं आहे, निवडणुकीची सुरुवात झालेली आहे. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. ओबीसीसाठी सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेनंतर ओबीसीचे आरक्षण थांबवलं जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला एससीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. या दोन्हीच्या अनुषंगाने इलेक्शन महत्त्वाचे आहे.”, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी म्हणजेच गॅस सिलेंडरच्या पाठीमागे उभे रहा, असं आवाहन देखील मतदारांना केलं आहे. (Sanjay Raut)
News Title – Sanjay Raut advice to Prakash Ambedkar
महत्त्वाच्या बातम्या-
पवार कुटुंबात फूट; 50 वर्षांत ‘हे’ पहिल्यांदाच घडलं
जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार- संभाजीराव पाटील निलंगेकर
‘धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार’; संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास