“हर कुत्ते का दिन आता है…” संजय राऊत आक्रमक

मुबंई | शिवसेना हे नाव आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ( CM Eknath Shinde) गटाला मिळालं आहे. या निर्णयामुळं शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. हर कुत्ते का दिन आता है… ही म्हण आहे. कोकणात जशी माकड येतात,तशी हत्तीदेखील घुसतात. अश्या शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊतांनी निवडणूक आयोग आणि भाजप-शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. पाळीव कुत्र्यानं भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही. अश्या शब्दात संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. आम्ही कायद्याची लढाई लढत राहू. सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागणार असल्याचं राऊतांनी सांगितलं आहे.

जनता मुर्ख, तुम्ही खुर्चीवर बसलात म्हणून तुम्हाला कायदा कळाला असं नाही.लोकशाही, लोकभावना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदेंच्या निवासस्थानी अडीच कोटीच्या जेवणावळी होतात. या निर्णयामुळं बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती झाली आहे,असा टोला शिंदे गटाला लगावला आहे.

गळा दाबून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला लावला. दिल्लीतील (Delhi) महाशक्तीनं आधीच शिंदेंना चिन्ह देण्याचं वचन दिलं होतं,असा आरोप राऊतांनी केला आहे. ही लढाई मिंधे गट आणि शिवसेना नसून मिंधे गटामागे असणारी महाशक्ती विरुद्ध शिवसेना आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-