बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | राज्य सरकारांना एखाद्या समाजास आरक्षण देण्याचा अधिकार देणारे विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर झाले आहे. मंगळवारी लोकसभेत आणि बुधवारी राज्यसभेत विधेयक पारित झाले आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. बुधवारी 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर चर्चा चालू होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्यानं उपस्थित करणारे संभाजीराजे यांना संसदेत बोलण्याची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर संजय राऊत राज्यसभेत बोलण्यासाठी उभा राहिले आणि त्यांनी सभापतींकडे संभाजीराजे यांना बोलू देण्याची मागणी केली.

संजय राऊतांच्या मागणीनंतर शिवसेना खासदारांनीही त्यांना बोलू देण्याचा आग्रह धरला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ते वंशज आहे. ज्यांनी देशात पहिल्यांदा आरक्षण लागू केलं. त्यांना बोलू दिलं जात नाही. त्यांना 2 मिनिटं तरी बोलू द्यावं, अशी मागणी संजय राऊतांनी केली. त्यानंतर सभापतींनी संभाजीराजे यांना संसदेत आपला मुद्दा मांडू दिला.

दरम्यान, दोन मिनिटांचा वेळ दिल्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यसभेत 2 विधेयकात 2 सुधारणा सुचवल्या आहेत. त्यानंतर आता राज्यसभेत विधेयक पारित झालं आणि राष्ट्रपतींच्या सहीसाठी विधेयक पाठवण्यात आलं आहे. संभाजीराजे यांना संसदेत बोलू दिल्यानं संभाजीराजे यांनी संजय राऊतांचे ट्विट करत आभार मानले आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More