“राज्याचे गृहमंत्री युजलेस”, संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले खडेबोल

Sanjay Raut | वरळी हिट अँड रनप्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. राज्यात मराठी माणूस सुरक्षित नसल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. हिट अँड रनप्रकरणावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्यसरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणात कावेरी नाखवा यांच्या कुटुंबाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 लाखांची मदत केली. त्यावरून एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतात का? ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का? असा तिखट सवाल त्यांनी केला.

“गृहमंत्री युजलेस आहेत”

त्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांना युजलेस म्हटलं आहे. ते म्हणाले की मी वैयक्तिक टीका करत नाही, पण राज्याचे गृहमंत्री हे युजलेस आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना खडेबोल सुनावले आहे. तसेच निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं आहे. ती तुमची लाडकी बहीण नाही का? असं म्हणत राऊतांनी संवेदनशील सवाल उपस्थित केला आहे.

जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचं कुटुंब यांना शिक्षा होत नाही, तोवर तुमच्या दहा लाखांना किंमत नाही. त्याचा जीव हा दहा लाखांचा आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत. ते काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का? असा जळजळीत सवाल संजय राऊतांनी केला आहे.

“ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का?”

मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत. ती महिला काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे का? आले की पैसे वाटायचे, याला वाट, त्याला वाटा. कायदा आणि सुव्यवस्था या राज्यात नग्न झालेली आहे, चिरडून मरतेय. राज्याचे गृहमंत्री हे युजलेस गृहमंत्री आहेत. आतापर्यंत मुंबईच्या रस्त्यावर मोठी गंभीर दुर्घटना घडली. यावर साधं गृहमंत्र्यांकडून निवेदन तसेच साधी संवेदना देखील नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

वरळी अपघात प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, हे अपघात प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालावं, अशी मागणी करणार आहोत. तसेच, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली जावी अशीही मागणी असेल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत.

हिट अँड रन प्रकरणावर कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यावर बोलत असताना संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले की, काय चाललं तरी काय? 10 लाख रूपये दिले. चेंगराचेंगरी झाली 5-5 लाख रूपये दिले, 50 लाख दिले. अपघात झाला 50 लाख दिले. हे काय पैशाचं राजकारण सुरू आहे का? असा सवाल आता संजय राऊतांनी केला आहे.

News Title – Sanjay Raut Aggressive On Devendra Fadanvis

महत्त्वाच्या बातम्या

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा!

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होण्याची संभावना!

पुण्यात ड्रोनच्या घिरट्या थांबायचं नाव घेईनात; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

ऐकावं ते नवलंच! पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 महिला बॉयफ्रेंडसोबत झाल्या फरार, पती मात्र..

सावधान! पुढील तीन दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता