मोदींच्या डिग्रीवरून नवा वाद; संजय राऊत अजित पवार आमनेसामने?

मुंबई | राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) डिग्रीवरून नवा वाद सुरू झालाय. गुजरात हायकोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendta Modi) यांची डिग्री सार्वजनिक करण्याचा आदेश रद्द ठरवल्यानंतर आता विरोधकांनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे.

देशाच्या पंतप्रधानांना आपली डिग्री दाखवण्याची लाज का वाटावी, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगर येथील सभेत हाच मुद्दा उचलून धरला तर आज संजय राऊत यांनीदेखील पंतप्रधानांना डिवचणारे ट्विट केलं आहे. यामुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) विरूद्ध संजय राऊत (Sanjay Raut) असं चित्र निर्माण झाल्याचं दिसतंय.

अजित पवार यांनी आपली भूमिका मांडताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, 2014 ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिलं आहे का?. मोदींनी देशात 2014 ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्व श्रेय मोदींनाच दिलं पाहिजे. डिग्रीवर काय?, असा सवाल अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More